बीडमध्ये आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचा मोर्चा

December 20, 2016 6:37 PM0 commentsViews:

beed_muslim_marcha20 डिसेंबर  : मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी जिल्हा क्रीडा संकुलातून या मोर्च्याला सुरुवात झाली.  मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळावं, मुस्लीम समाजाच्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने कोणतीही ढवळाढवळ करू नये आणि मुस्लीम समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशा मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आल्या. मुस्लीम समाजातील मुलींनी या मोर्चाचं नेतृत्त्व केलं. तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close