कदाचित आम्ही लक्ष्मी दर्शनात कमी पडलो-उद्धव ठाकरे

December 20, 2016 7:04 PM0 commentsViews:

uddhav on khadse20 डिसेंबर : नगरपरिषदेचा निकाल लागलाय. आम्ही काही ठिकाणी कमी पडलोय. कदाचित लक्ष्मी दर्शनात कमी पडलो  पण मुळात ही आमची पद्धत नाहीये असं सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांचा उल्लेख न करता टोला लगावलाय. तसंच शिवस्मारक होणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर कोळी बांधवांचेही प्रश्न महत्वाचे आहेत,त्यांना याबाबत विश्वासात घेतलं पाहिजे असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. ते रत्नागिरीत बोलत होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथील डी.जे.सामंत महाविद्यालय इथं कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केलीय. नोटाबंगदी तसंच दानवेंच्या लक्ष्मीदर्शन संबंधीच्या वक्तव्यावरही उद्धव ठाकरेंनी टीका केलीय.

उद्धव ठाकरेंनी नोटबंदीवरुन पुन्हा भाजपलं टार्गेट केलंय. कदाचित त्यांना लक्ष्मी दर्शन दिलं असेल, कदाचित आम्ही लक्ष्मी दर्शनात कमी पडलो त्यामुळे जास्त जागा आल्या नाही  असं म्हणत त्यांनी दानवेंना टोला लगावला. तर भाजप-शिवसेना महापालिका युती करण्याबाबत अजूनही अंतिम निर्णयाप्रत पोहोचलेलो नाही. जिल्हा परिषदांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. नोटाबंदीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. त्यावर जनता नाराज असल्याचंही उद्धव यांनी सांगितलं.

तसंच शिवस्मारक होणं महत्वाचं आहे ही चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर कोळी बांधवांचेही प्रश्न महत्वाचे आहेत.त्यांना याबाबत विश्वासात घेतलं पाहिजे .असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close