…तर पवारांच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमिपूजन, राष्ट्रवादीचा भाजपला इशारा

December 20, 2016 7:16 PM0 commentsViews:

pune_metro_ncp_vs_bjp20 डिसेंबर : पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजनावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मानापमान नाट्य रंगतंय. 24 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे. पण जर या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नाव नसेल तर राष्ट्रवादी 23 तारखेलाच पवारांच्या हस्ते भूमिपूजन करणार असल्याचा इशारा पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिलाय.

पुण्यात मेट्रोच्या भुमिपुजनावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद निर्माण झालाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्यानं राष्ट्रवादीनं बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय.    भाजप प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे मेट्रोच्या उद्घाटनाला शरद पवारांना योग्य तो सन्मान दिला नाही, तर राष्ट्रवादी या कार्यक्रमावर बहिष्कार घालणार असंही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलंयय पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासोबत महापौरांची बैठक झाली. त्यावेळेला आपण बापट यांना हे सांगितल्याचं प्रशांत जगताप यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close