वडिलांच्या अंतिम इच्छेखातर आयसीयूमध्ये शुभमंगल !

December 20, 2016 9:26 PM0 commentsViews:

20 डिसेंबर : रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लग्न होईल असा विचार तरी कुणी केला असेल का? पण असा प्रसंग पुण्यात घडला. ज्ञानेश आणि सुवर्णा यांनी ज्ञानेशचे वडील यांच्या इच्छेखातर दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि या अनोख्या लग्नाचे साक्षीदार असलेल्या डॉक्टर , नर्स  या सगळ्यांचे डोळे पाणावले.

icu_marridgeदीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या एक मध्ये नुकताच हा आगळा विवाह सोहळा पार पडला. एमबीए झालेला ज्ञानेश देव आणि एमबीएच झालेली सुवर्णा काळनगे यांचा विवाह मंगल कार्यलयात होणार होता. दरम्यान, ज्ञानेशचे वडील नंदकुमार  हृदयविकारामुळे रुग्णालयात अॅडमिट झाले आणि प्रकृती खालावल्याने आयसीयूमध्ये भर्ती झाले.

आपल्या डोळ्या देखत विवाह व्हावा अशी इच्छा नंदकुमार यांची होती आणि ती पूर्णकरण्या करता ज्ञानेश आणि सुवर्णाने हा धाडसी निर्णय घेतला. नियतीचा तऱ्हा अशी की हा विवाह झाल्यावर काही तासातच नंदकुमार यांची प्राणज्योत मालवली. पण वधूवर यांना वडिलांच्या समोर त्यांचे आशीर्वाद घेऊन विवाह झाला याचं समाधान होतं.एरवी डॉक्टर किंवा रुग्णालये भावना हीन असतात याला ही अपवाद ठरलं ते मंगेशकर रुग्णालय…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close