गोंदियामध्ये हॉटेलला लागली भीषण आग, सात जणांचा मृत्यू

December 21, 2016 9:56 AM0 commentsViews:

gondiya hotel

21 डिसेंबर : गोंदिया शहरातील बिंदल थाट-बाट हॉटेलला मोठी आग लागली आहे. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली असून सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या आगीत आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता आहे.

पहाटे लागलेली आग अजूनही धुमसतीच आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हॉटेलमध्ये 10 ते 15 जण अडकले असण्याची शक्यता असून एका व्यक्तीचा मृतदेहही सापडला आहे. हे हॉटेल मुख्य बाजारपेठेत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते.

दरम्यान पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून गोंदियासह, अदानी, तुमसर या ठिकाणहून अग्निशमन दलाच्या गाड्याही दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरीही आग अद्याप धुमसत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close