सगळीकडे ‘तैमूर’ची चर्चा

December 21, 2016 9:12 AM0 commentsViews:

477868-464718-439955-saif-ali-khan-and-kareena-kapoor

21डिसेंबर: काल सैफिनाला मुलगा झाला आणि कालचा दिवस टाॅक आॅफ टाऊन ते बाळ आणि त्याचं ठेवलेलं नाव झालं. सोशल मीडियावर तैमूर अली खान हे नाव टाॅप ट्रेंड झालं होतं.
बाॅलिवूडच्या सगळ्या हस्तींनी करिना-सैफवर शुभेच्छांचा वर्षाव केला.करण जोहर,सोनम कपूर अशा अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छांसोबत करिना आणि तैमुरचा एक फोटोही वायरल झाला.व्हाॅट्सअप,ट्विटरवर हा फोटो अनेकांनी शेअर केला. हा फोटो खरा आहे की नाही याची शंका असूनही तो शेअर झाला.

याशिवाय काल चर्चा होती ती तैमूर या नावाबद्दल. तैमूर हे एका राजाचं नाव. बाबर हा तैमूरचा वंशज. पण नावात काय आहे, असं शेक्सपियरनंच म्हटलंय.
सध्या मात्र कपूर आणि खान कुटुंबात आनंदोत्सव साजरा होतोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close