मुंबईत भायखळ्यात लागलेली आग आटोक्यात

December 21, 2016 8:43 AM0 commentsViews:

530837-vishakhapatnam-fire-pti

21 डिसेंबर : मुंबईतील भायखळ्यातील मदनपुरा या मुस्लीम बहुल वस्तीतील काही गोदामांना काल रात्री उशीरा आग लागली. या आगीत कपडे आणि खेळण्यांची 50 हून अधिक छोटी मोठी गोदामं आणि काही घरं जळून खाक झाल्या आहेत.  सुदैवाने या दुर्घटनेत कोणतिही जीवीतहानी झाली नाही.

रात्री साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. रौद्र रूप घेतलेल्या या आगीला अग्निशमनदलाच्या 14 गाड्यांनी आटोक्यात आणली.  दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे ही आग वेगाने पसरली. त्यातच अरूंद गल्ल्या आणि घटनास्थळी मोठा जमाव जमल्यामुळे अग्निशमन दलाला घटनास्थऴापर्यंत पोहोचायला मोठी कसरत करावी लागली. अखेर पहाटे ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close