मेक्सिकोत फटाक्यांच्या बाजारात स्फोट, 27 ठार

December 21, 2016 12:22 PM0 commentsViews:

j2cjvmode6ghnty_gne8-jaoere1-xe

21 डिसेंबर: मेक्सिकोमधील सर्वात मोठ्या फटाका बाजारात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात जवळपास 27 जणांचा मृत्यू झाला असून 70 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. राजधानी मेक्सिकी सिटीपासून 32 किमी अंतरावर असणाऱ्या सेन पल्बिटो फटाका बाजारात ही दुर्घटना घडली. इथे मोकळ्या मैदानात हा बाजार भरवला जातो.  सुरुवातीला एका स्टॉलला आग लागली, त्यानंतर ही आग धुमसत गेली. दरम्यान, या स्फोटाची तिव्रता लक्षातमृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.

ख्रिसमस आणि नववर्ष साजरा करण्यासाठी लोकांची फटाके घेण्यासाठी गर्दी झालेली असतानाच ही दुर्घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की, फक्त बाजारच नाही तर जवळ असणारी घर आणि गाड्याही जळून खाक झाल्या आहेत. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाला तीन तास लागले. तर आगीमुळे प्रचंड नुकसान झालं असून संपुर्ण बाजार जळून खाक झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close