अनिल कपूरच्या ‘मुबारका’चं शूटिंग 14जानेवारीपासून

December 21, 2016 11:47 AM0 commentsViews:

anil-kapoor-1

21डिसेंबर: अनिल कपूरच्या ‘मुबारका’ सिनेमाचं शूटिंग 14 जानेवारीपासून सुरू होतंय.या सिनेमात पहिल्यांदाच अनिल कपूर आपला पुतण्या अर्जुन कपूरसोबत दिसणार आहे.

ü’मी या सिनेमात सरदाराची भूमिका साकारतोय. शूटिंग 14 जानेवारीपासून सुरू होतंय.अर्जुननं आधीच सिनेमाचं शूट सुरू केलंय.’अनिल कपूर म्हणाले.

या सिनेमासाठी अनिल कपूरनं एक फंकी हेअरस्टाइल केली होती. पण सिनेमाचा दिग्दर्शक अनिस बझ्मी यानं ती नाकारली.
‘मी ‘मुबारका’साठी वेगळा लूक पाहत होतो. पण दिग्दर्शकानं मला सांगितलं, की मला सिनेमात सरदाराची भूमिका आहे. आणि त्यासाठी मला फेटा घालायचा आहे.’अनिल कपूर म्हणतात.

‘मुबारका’मध्ये इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टीही आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close