तैमूरच्या स्वागताला बाॅलिवूड हजर

December 21, 2016 12:41 PM0 commentsViews:

21 डिसेंबर: करिना कपूरनं काल ब्रिच कँडीमध्ये बाळाला जन्म दिला. आणि तिला भेटायला तिचं कुटुंब आणि मित्र मैत्रिणी लगेच निघाले. पाहू या तिच्या भेटीला कोण कोण आलंय ते…

सैफची आई आणि करिनाची सासू शर्मिला टागोर-पतौडी आपल्या नातवाला पाहायला लगेच पोचली.

तैमूरचे आजोबा म्हणजे रणधीर कपूरही तातडीनं निघाले.

आजी बबितालाही आपल्या लेकीची काळजी होती. ती कशी मागे राहील?

आणि मावशी करिष्मा कपूरचा आनंद तर गगनात मावत नव्हता, हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होतं.

सोहा अलीचा नवरा कुणाल खेमूही बाळ बाळंतिणीला भेटायला आला.

सैफची बहीण सबा खाननंलाही भाचाला भेटायची उत्सुकता होतीच.

करिनाची आत्या रितूनंही हाॅस्पिटलमध्ये धाव घेतली

सोनम कपूरची बहीण रियाही करिनाला पाहायला आली.

अख्ख्या बाॅलिवूडला बाळ-बाळंतिणीबद्दल उत्सुकता होतीच. कपूर आणि खान कुटुंबाचा हा आनंद सोहळा सगळेच साजरा करत होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close