शिवस्मारक भूमिपूजन जाहिरातीसाठी 18 कोटी खर्च

December 21, 2016 3:50 PM0 commentsViews:

123724-shivsmarak

21 डिसेंबर: अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारक भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकार तब्बल 18 कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबईसह 10 महापालिका निवडणुका आणि 26 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही शिवस्मारक भूमिपूजनाची प्रसिद्धी केली जातेय.

प्रसिद्धीसाठी राज्यभरात जवळपास 5 हजार होर्डिंग्ज लावण्यात येणार आहेत. यातील 1800 होर्डिंग्ज हे माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या मालकीचे आहेत, तर उर्वरित होर्डिंग्जसाठी सरकार भाडे भरणार आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावून याची प्रसिद्धी केली जाणार आहे. त्याचबरोबर राज्य स्तरावरील आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर या कार्यक्रमाच्या जाहिरातीही दिल्या जाणार आहेत. राज्यातल्या 37 जिल्हा मुख्यालयांना या कार्यक्रमाची जाहिरात आणि प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close