टाटा-रिलायन्स वाद कायम

May 17, 2010 11:14 AM0 commentsViews: 11

17 मे

टाटा पॉवर आणि रिलायन्स यांच्यातील वीज वाद अजूनही सुरुच आहे.

टाटा पॉवर आपल्या भूमिकेवर ठाम आहे. शुक्रवारी सरकारने टाटाला रत्र पाठवून रिलायन्सला नियंत्रित दरात वीज देण्याचे निर्देश दिले. तसेच टाटाकडील वीज टाटाला मंुबई बाहेर विकता येणार नाही, असे निर्देशही राज्य सरकारने दिलेत.

सरकारच्या या पत्राला टाटा आज उत्तर देणार आहेत. तसेच टाटाची 160 मेगावॅट वीज, जी सध्या रिलायन्स वापरते, ती वीज आपल्या ग्राहकांकरता वळती करण्यात यावी, अशी मागणी टाटांनी स्टेट डिस्पॅच सेंटरकडे केली आहे. पण त्याला स्टेट डिस्पॅच सेंटरने नकार दिला आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळे मुंबईवरचे लोडशेडिंगचे संकट सध्या तरी टळले आहे.

close