मानापमान नाट्य संपलं, उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं भूमिपूजनाचं निमंत्रण

December 21, 2016 5:49 PM0 commentsViews:

uddhav_smarak21 डिसेंबर : ‘सन्मानानं बोलावं तर भूमिपूजनाला येणार’ असा पवित्रा घेणाऱ्या शिवसेनेनं आता नरमाईची भूमिका घेतलीये. उद्धव ठाकरे यांनी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण स्विकारलं असून पंतप्रधान मोदींसह उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 डिसेंबरला मुंबई आणि पुणे दौऱ्यावर येत आहे. मोदींच्या हस्ते मुंबईत शिवस्मारकाचं आणि पुण्यात मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे. या दोन्ही भूमिपूजनावरून वाद मिटल्यात जमा आहे.

शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरुन उद्धव ठाकरे नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केलाय. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री  विनोद तावडे यांनी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचं उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन निमंत्रण दिलं. उद्धव ठाकरे यांनीही निमंत्रण स्विकारलं आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close