सहारा कंपनीकडून मोदींनी कोट्यवधी रुपये घेतले -राहुल गांधी

December 21, 2016 6:32 PM0 commentsViews:

rahul vs modi _bihar21 डिसेंबर :  नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहारा कंपनीने त्यांना सहा महिन्यात 9 वेळा  कोट्यवधी रुपये दिले असल्याला गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. तसंच त्यांनी याचा पुरावा सुद्धा भरसभेत जाहीर केलाय.

राहुल गांधी यांनी आपण काही बोललं तर भूकंप होईल असा इशारा दिला होता. अखेर आज राहुल गांधी यांनी ‘तो’ आरोप जाहीर केलाय.  गुजरातमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.  नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा सहारा कंपनीने 6 महिन्यात 9 वेळा पैसे दिले होते. 2013 मध्ये आयटीच्या छाप्यात ही बाब उजेडात आली. सहाराच्या अधिकाऱ्यांनीही आपल्या डायरीत याची नोंद लिहिलेली आहे असं राहुल यांनी सांगितलं.

तुम्ही मला संसदेत बोलू दिलं नाही आणि माझ्यासमोरही उभे राहिले नाही. पण, कोणत्याही व्यवहारात कुणाला किती पैसा दिला जातो याची नोंद लिहिली जात असते. सहारानेही आपल्या रेकॅार्डमध्ये लिहून ठेवलं होतं. 22 नोव्हेंबर 2014 ला सहारावर छापा पडला होता. तेव्हा सहाराच्या रेकॅार्डमध्ये 30 अाॅक्टोबर 2013 ला मोदींना अडीच कोटी रुपये दिले. 12 नोव्हेंबरला 5 कोटी, 29 नोव्हेंबरला 5 कोटी, 6 डिसेंबरला 5 कोटी, 19 डिसेंबरला 5 कोटी , जानेवारी 2014 ला 5 कोटी, 28 जानेवारीला 5 कोटी आणि 22 फेब्रुवारीला 5 कोटी दिले होते अशी तपशीलवार माहिती राहुल यांनी सभेत दिली.

तसंच मोदींबद्दलची ही माहिती आयकर विभागाकडे होती. आयकर विभागानेही या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली होती. पण चौकशी झाली नाही. का या प्रकरणाची चौकशी का झाली नाही ?, हे खरं आहे की खोटं हे देशाला कळू द्या, तुम्ही लोकांच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला. लोकांना रांगेत उभं केलं. आता तुम्ही खरं बोला आणि लोकांना कळू द्या असं आव्हानच राहुल गांधींनी मोदींना केलं.

असेच रेकॅार्ड ब्रिला कंपनीकडे आहे. आता मोदी तुम्ही पंतप्रधान आहात. तुमच्यावर प्रश्न निर्माण होत आहे. आता तुम्हीच देशाला सांगा की खरं काय आहे ? , या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करणार का असे सवालही राहुल यांनी उपस्थिती केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close