ठाण्यात 27 कोटी किंमतीचं युरेनियम जप्त

December 21, 2016 7:26 PM0 commentsViews:

uranium21 डिसेंबर :  ठाण्यामध्ये तब्बल 27 कोटी किंमतीचं युरेनियम जप्त करण्यात आलंय. ठाणे गुन्हे शाखेनं घोडबंदर रोडवर आठ किलो ८६१ ग्राम बहुमूल्य युरेनियम जप्त केलंय. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून  भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरकडून या युरेनियमचे माहिती घेण्यात आली असून हे युरेनियमचा असल्याचं उघड झाले आहे.

हे युरेनियम भारताबाहेरच्या असल्याचे तपासात उघड झाले असून या युरेनियम मागे कोणाचा काय हेतू होता याचा तपास आता ठाणे गुन्हे शाखा घेत आहे. युरेनियम हा अतिसंवेदनशील धातू असून त्याचा वापर हा संवेदनशील आहे. देशविघातक तत्वांचा हात या प्रकारात आहे का याचा देखील तपस घेतला जात आहे. ठाणे गुन्हे शाखेनं दोन आरोपीना ताब्यात घेतले असून युरेनियम एनर्जी कायद्यानुसार याचा गुन्हा दाखल होणार असून साधारण गुन्ह्यांपेक्षा हा गुन्हा हा वेगळा आहे. या प्रकारात आणखी तपास होणे आवश्यक असून त्यासाठी गुन्हे शाखा तपास करत असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close