आघाडी सरकारची वर्षपूर्ती

May 17, 2010 11:48 AM0 commentsViews: 12

पल्लवी घोष, नवी दिल्ली

17 मे

आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. यानिमित्ताने 'सीएनएन-आयबीएन' आणि 'हिंदुस्तान टाईम्स'ने एक सर्व्हे घेतला. त्यात पंतप्रधान मनमोहनसिंग हे सगळ्यात निर्णयक्षम, संयमी पंतप्रधान आहेत. पण दुसरीकडे महागाई आणि भ्रष्टाचारासारखे प्रश्न सोडवण्यात ते अपयशी ठरलेत, अशी मते नागरिकांनी व्यक्त केली आहेत.

2009च्या निवडणुकीत विरोधकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग हे एक कमकुवत, कमजोर पंतप्रधान असा प्रचार केला होता. पण आपण कणखर असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या कामातून दाखवून दिले.

61 टक्के लोकांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक प्रभावी, गतीमान आणि निश्चित लक्ष्य असलेले पंतप्रधान ठरवले. तर 7 टक्के लोकांच्या मते ते कल्पकतेचा अभाव असलेले थंड पंतप्रधान आहेत. 4 टक्के लोकांच्या मते त्यांच्यात कुशलता आणि सातत्याचा अभाव आहे. आणि 28 टक्के लोकांच्या मते त्यांनी अधिक ठाम व्हायला हवे आहे.

बहुतांश लोकांनी पंतप्रधानांबद्दल चांगले मत व्यक्त केले असले तरी तज्ज्ञांच्या मते महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर पंतप्रधानांची कामगिरी निराशाजनक आहे.

31 टक्के लोकांच्या मते भ्रष्टाचार आणि भ्रष्ट मंत्र्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात पंतप्रधान अपयशी ठरलेत.तर 39 टक्के लोकांच्या मते महागाई रोखण्यात आलेले अपयश हे पंतप्रधानांचे सर्वात मोठे अपयश आहे.यूपीएतल्या मंत्र्यांच्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवरही तज्ज्ञांनी पंतप्रधानांना चांगले मार्क्स दिले आहेत.

42 टक्के लोकांच्या मते मनमोहन सिंग सहकार्‍यांवर योग्य नियंत्रण ठेवणारे पंतप्रधान आहेत. तर 24 टक्के लोकांच्या मते मनमोहन सिंग वेगळा विचार करणारे पंतप्रधान आहेत.

42 टक्के लोकांनी पंतप्रधानांना आपल्या सहकार्‍यांवर चांगले,योग्य ते नियंत्रण ठेवणारे पंतप्रधान म्हटले. तर 24 टक्के लोकांनी पंतप्रधानांना वेगळा विचार करणारे म्हटले आहे.

20 टक्के लोकांच्या मते त्यांनी पक्षाला सोबत घेऊन काम केले. 24 टक्के लोक म्हणतात, त्यांनी भारत अमेरिका संबंध सुधारले. आणि 37 टक्के लोकांच्या मते त्यांनी जागतिक मंदीच्या काळात भारताला वाचवून देशाचा आर्थिक विकास घडवून आणला.

close