पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा वाद ‘यार्डात’, पवार-मोदी एकाच व्यासपीठावर

December 21, 2016 9:15 PM0 commentsViews:

pune_metro_ncp_vs_bjp21 डिसेंबर  : अखेर पुण्यात 23 डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन करण्याचा मनसुबा उधळला गेलाय. आता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रोचं भूमिपूजन होणार आहे तर शरद पवार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

पवार यांचं भाषणही होणार आहे. या आधी पुणे पालिकेचे महापौर प्रशांत जगताप यांनी पालकमंत्री भाजपचे आमदार गिरीश बापट हे श्रेयाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा घाट घातला होता. काँग्रेसनं मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे तर मनसेनं निवडणुकीच्या तोंडावर भाजप,राष्ट्रवादी पुणेकरांना मेट्रोचं गाजर दाखवत असल्याची टीका केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close