‘त्या’ 57 लाख प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला अटक

December 21, 2016 9:55 PM0 commentsViews:

21 डिसेंबर : राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. बाजार समितीतल्या कर्मचाऱ्यांची 57 लाखाची रोकड कारमध्ये सापडल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली.

devidas_pingle357 लाखांची रक्कम बाजारसमिती कर्मचाऱ्यांची असल्याचं स्पष्ट झालंय. पंचवटी पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारसमिती कर्मचाऱ्याने याबद्दल तक्रार केली होती. पिंगळेंनी खोट्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्याची बळजबरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, देवीदास पिंगळेंच्या मालमत्तेची झडती सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची 3 विशेष पथकं तपासणी करतायत. ते राहत असलेला बंगला आणि त्यांच्याआलिशान फार्म हाऊसची झडती सुरू आहे.

कोण आहे देविदास पिंगळे?
- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार
 सध्या नाशिक जिल्हयातल्या सर्वात मोठ्या नाशिक बाजार समितीचे सभापती
- 2004 ते 2009 या कालावधीत होते नाशिकचे खासदार
पवारांचे जवळचे सहकारी
- अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि भुजबळ विरोधक अशी नाशिकमध्ये ओळख


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close