जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुकांचा बिगुल

October 19, 2008 9:05 AM0 commentsViews: 118

19 ऑक्टोबर, दिल्लीनिवडणूक आयोगाने आज जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. पहिला टप्पा 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून शेवटचा टप्पा 24 डिसेंबरला होणार आहे. महिनाभर निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 87 विधानसभा जागांसाठी ही निवडणूक पार पाडत आहे. ही निवडणूक होणार का नाही, याबाबत अनिश्चितता होती.

close