युवराज आता कुठे बोलायला शिकतायत, मोदींचा राहुल गांधींना टोला

December 22, 2016 1:18 PM0 commentsViews:

BRKING940_201612221244_940x355

22 डिसेंबर: काँग्रेसचा एक युवा नेता भाषण द्यायला शिकतोय. जेव्हापासून तो बोलू लागलाय, मला अतिशय आनंद झालाय. युवा नेता बोलला नसता तर भूकंप झाला असता. आता तो बोलू लागल्यामुळे भूकंपाची शक्यताच नाही, अशा उपरोधिक शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अप्रत्यक्षपणे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली.

ते आज (गुरूवारी) वाराणसी हिंदू विद्यापीठातील कार्यक्रमात बोलत होते.   राहुल गांधींनी काल (बुधवारी) मोदींवर 40 कोटी रूपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. त्याला मोदींनी थेट उत्तर न देता चिमटे काढण्याचा प्रयत्न केला. युवराज बोलले नसते तर कदाचित भूकंप झाला असता अशी मिश्किल टीका करायलाही मोदी विसरले नाहीत. वाराणसीत मोदी आज आणखी काही कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे, पण त्यात तरी मोदी राहुलच्या आरोपांना थेट उत्तर देणार का याची उत्सुकता आहे.

यावेळी मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही लक्ष्य केलं आहे. काही लोक विरोध करताना स्वत:चे संतूलन गमावून बसतात. मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणात ५० टक्के गरीब असलेल्या देशात रोकडरहित अर्थव्यवस्था कशी राबवता येणार, असा सवाल उपस्थित केला होता. मात्र, हा सवाल उपस्थित करून मनमोहन सिंग स्वत:च्याच अपयशाचा दाखला देत आहेत. गेल्या 60 वर्षांत देशातील लोक कोणामुळे गरीब राहिले?, असा प्रतिसवाल मोदी मनमोहन सिंग यांना विचारला. मनमोहन सिंग यांनी मला विरोध जरूर करावा. मात्र, हे करताना त्यांनी भान ठेवावे. ते देशाचे माजी पंतप्रधान होते, लोक त्यांचे बोलणे गांभीर्याने घेतात, असं सांगत मोदींनी मनमोहन सिंग यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

निश्चलनीकरणाचा निर्णय घेताना पंतप्रधानांना परिणामांचा अंदाज नव्हता, अशी टीका विरोध माझ्यावर करतात. हे खरे आहे. सध्या देशात सर्वात मोठी स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यात काही जण भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. देशातील काही राजकीय नेते इतक्या ताकदीने भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विचारही केला नव्हता. काळ्या पैशासोबत काही मनंही समोर आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close