‘घागर विठोबा’ संकल्पना हास्यास्पद

May 17, 2010 12:21 PM0 commentsViews: 25

17 मे

पंढरपुरात कर्मठांकडून पाळण्यात येणारी 'घागर विठोबा' ही संकल्पना हास्यास्पद असल्याचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी म्हटले आहे.

1 मे 1947 ला साने गुरुजींनी 10 दिवस उपोषण केल्यानंतर विठोबा मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले. पण यानंतर काही पुरोहित, पंडित, शास्त्री, कीर्तनकार यांनी देवळातील विठोबा अपवित्र झाला, असे सांगत श्री विठ्ठलाला अभिषेक घातला.

हे अभिषेकाचे पाणी एका घागरीत ठेवले. आणि याच पाण्यात विठोबाच्या मूर्तीतील तेज काढून ठेवले, असे वारकर्‍यांना सांगितले. त्यानंतर सुमारे 64 वर्षे विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन न घेता हे कर्मठ लोक या घागरीचे दर्शन घेत आहेत.

पण आता खुद्द शंकराचार्यांनीच पंढरपुरात येऊन अशा प्रकारे तेज काढून घेण्याचा प्रकार खोटा असल्याचे सांगून कर्मठांना चपराक दिली आहे.

close