‘दंगल’ टॅक्स फ्री करा-आमिर खान

December 22, 2016 2:16 PM1 commentViews:

dangal

22डिसेंबर: उद्या बहुचर्चित दंगल रिलीज होतोय.आमिर खाननं थिएटर्स मालकांना सिनेमाच्या तिकिटांची किंमत वाढवू नका असं सांगितलंय. याशिवाय सिनेमा टॅक्स फ्री करायची विनंतीही 12 राज्यांना केलीय.

कुठलाही मोठा सिनेमा रिलीज होतो, तेव्हा अनेक थिएटर्समध्ये तिकिटांचा दर नेहमीपेक्षा जास्त ठेवला जातो. पण तसं करू नका अशी विनंती आमिरनं केलीय. आमिर म्हणतो, ‘हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्य़ंत पोचावा असं मला वाटतंय. सिनेमा टॅक्स फ्री घोषित झाला तर जास्तच बरं. आम्ही 12 राज्यांना तशी विनंती केलीय.’

कुस्तिवीर महावीर फोगट यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. आमिरनं त्यात महावीर फोगट यांची भूमिका केलीय. फोगट यांनी गीता आणि बबिता फोगट यांना कसं घडवलं यावर सिनेमात झोत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • yogesh patil

    Saheb tumhi ya cinemat phukat kaam kela ka???natak bad kara. Did you act for free in this movie,why govt means the inadin people in end should loose on tax ,any logic?????

close