राम मंदिर स्टेशनवरुनही भाजप-सेनेमध्ये श्रेयवादाची लढाई

December 22, 2016 2:55 PM0 commentsViews:

maxresdefault

22 डिसेंबर  : राम मंदिर स्टेशनच्या नामकरणानंतर उद्घाटन कोण करेल यावरूनही शिवसेना भाजपमध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली. आताही राम मंदिर स्टेशन बाहेर शिवसेनेचे आणि भाजपचे भलेमोठे बोर्ड लागले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज संध्याकाळी या नव्या स्टेशनचं उद्धाटन केलं जाणार आहे. त्यानंतर 6 वाजता या स्टेशनवर पहिली ट्रेन थांबेल.

राम मंदिर या स्टेशनच्या नावावरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. आधी या स्टेशनला ओशिवरा असं या नाव देणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर मात्र काही दिवसांपूर्वी या स्टेशनचं नाव राम मंदिर ठेवून त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही सरकारकडून निश्चित करण्यात आलं. सध्या प्लॅटफॉर्म 3 आणि 4 ला फक्त धीमी लोकल थांबेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close