चार आण्याची कोंबडी..,त्याला मिळाला चक्क 32 पैशांचा चेक !

December 22, 2016 4:48 PM0 commentsViews:

nandgaon_Chaqe22 डिसेंबर : सध्या चेक म्हटलं की, त्याच्यावर आकडा असतो तो हजारो रुपयांचा… मात्र एखाद्या चेकवर फक्त ३२ पैशांचा आकडा असल्याचं म्हटल्यास त्याच्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही मात्र अशी घटना समोर आलीय. नांदगाव तालुक्यातल्या न्यायडोंगरी गावात चक्क 32 पैशांचा चेक एका तरूणाला मिळालाय.

सचिन खैरनार या तरुणाकडे व्होडाफोन कंपनीचे पोस्ट पेड सिम कार्ड होते. मात्र त्याला आयडीया कंपनीचा सीम कार्ड घ्यायचा होता. त्यासाठी त्याने अगोदर व्होडाफोन कंपनीचे पूर्ण बिल भरले आणि सीम आयडीया कंपनीत पोर्ट केले. बिल भरताना त्याच्याकडून कंपनीला ३२ पैशे जास्त गेले होते. एका ग्राहकाकडून ३२ पैसे जास्त आल्याचे पाहून व्होडाफोन कंपनीने सचिनला ३२ पैशांचा चक्क चेक कुरियरने पाठवला आहे.

कुरियर कंपनीने त्याला तुझे महत्त्वाचे पाकीट आल्याचा फोन केल्यानंतर सचिन न्यायडोंगरी येथून मालेगावला गेला तेथे त्याने कुरियरचे पाकीट उघडून पहिले तर त्यात एक चेक होता त्यावर लिहिलेले होते ३२ पैसे… 32 पैशांचा चेक पाहून सचिनला आश्चर्याचा धक्का बसला.

मात्र, हा 32 पैशांचा चेक घेण्यासाठी या तरुणाला 200 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. शिवाय चेकचे कुरियर घेण्यासाठी त्याला तब्बल १०० किलो मीटरचा प्रवास ही करावा लागल्याने  चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला असे म्हण्याची वेळ या तरुणावर आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close