माझी खिल्ली उडवण्यापेक्षा उत्तरं द्या-राहुल गांधी

December 22, 2016 5:29 PM0 commentsViews:

rahul_gandhi_3322 डिसेंबर : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाराचे गंभीर आरोप केला होते. त्याला उत्तर देण्याएवजी मोदींनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवली होती. मात्र माझी खिल्ली उडवण्यापेक्षा माझ्या आरोपांना उत्तरं द्या असं थेट आव्हान राहुल यांनी मोदींना दिलंय.

सहारा कंपनीकडून नरेंद्र मोदी यांनी 40 कोटी रुपये घेतले असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली. आता कुठे युवराज बोलायला लागले आहे अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी टोला लगावलाय. तर युपीमधील बहराईचमध्ये झालेल्या रॅलीत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर पलटवार केला. नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाच्या खात्यात 15 लाख टाकणार होते. पण हे प्रत्यक्षात आले नाही. काळा पैसा असणा-या किती लोकांना मोदींनी तुरूंगात टाकलं. विजय मल्ल्या आणि ललित मोदींना देशाबाहेर जाऊ दिलं. आणि भरात भर म्हणजे नोटबंदीनंतर त्याच उद्योजकांचं कर्जही माफ केलं अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

काल गुजरातमध्ये मी मोदींना 2-3 प्रश्व विचारले. पण मोदींनी प्रश्नाची उत्तर दिली नाही उलट गंमत उडवली. गालिब यांचीही अशी खिल्ली उडवली होती. त्यावर गालिब म्हणाले होते ‘हर एक बात में कहते हो कि, तू क्या है, तुम ही कहो यह अंदाजे गुफ्तगू क्या है’ मोदी हा सवाल मी तुम्हाला विचारला नाही तर समस्त भारतीयांनी विचारला आहे. देशाच्या गरीब जनतेनं विचारला आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झालाय की, पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार केला की नाही ? तुम्ही माझी कितीही खिल्ली उडवा पण प्रश्नाचे उत्तर द्या असा टोलाही राहुल गांधी यांनी मोदींना लगावला. याआधीही राहुल गांधी यांनी टि्वट करून पुरावे जाहीर केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close