जलयुक्त शिवार योजना राबवण्याच्या पद्धतीचा फेरविचार करा :हायकोर्ट

December 22, 2016 7:43 PM0 commentsViews:

court_jalukt22 डिसेंबर : कोणतीही पूर्व तयारी नसताना जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे ही योजना राबवणं चुकीचं आहेय राज्य सरकारने तज्ञांच्या समितीद्वारे किंवा जलसंपदा प्राधिकरणाच्या माध्यमातून गांभीर्याने विचार करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहे.

राज्य सरकारने मागील वर्षी राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात हिरालाल देसर्डा यांनी जनहित याचिका दाखल केली होती.यावर सुनावणीदरम्यान, जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे, ही योजना शास्त्रीय अभ्यासावर आधारित नाही. कोणतीही पूर्व तयारी नसताना जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे ही योजना राबवणं चुकीचं आहे. यावर जलतज्ञ एच. एम. देसरडा यांच्या युक्तिवादाबाबत राज्य सरकारने तज्ञांच्या समितीद्वारे किंवा जलसंपदा प्राधिकरणाच्या माध्यमातून गांभीर्याने विचार करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहे.

तसंच दुष्काळादरम्यान कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी पाणी सोडण्याच्या संदर्भात राज्य सरकारला अधिकार नसून पिण्याचं पाणी अश्याप्रकारे धार्मिक विधीसाठी वापरण्याचा राज्य सरकारला अधिकार नाहीये हे देखील मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close