तुकाराम मुंढेंचा दणका, 5 भूमाफियांविरोधात गुन्हे दाखल

December 22, 2016 7:50 PM0 commentsViews:

Tukaram-Mundhe22 डिसेंबर : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता भूमामिया यांचं कंबरडं मोडलंय. नवी मुंबईतील 5 भूमाफियांवर महापालिकेने धडक कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.

गेल्या चार दिवसांपासून नवी मुंबई महापालिका आणि सिडकोच्या माध्यमातून गावठाण भागात भूमाफियांच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या इमारती जमीनदोस्त करण्याचं काम सुरू आहे.

या इमारती उभारणारे भूमाफिया,  बिल्डर, आर्कीटेक्ट आणि संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे यापूर्वीच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले होतं. त्यानुसार आज महापालिकेने राबाडा येथे अनधिकृत इमारती उभारणारे मेघनाथ शिंदे, राजू शिंदे, संजय जगदाळे, सुभाष सोनावणे, जगदीश हुजगे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या कायदेशीर कारवाईमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close