नाताळ,थर्टीफस्टला ‘होऊ दे खर्च’, पहाटेपर्यंत बिअर बार राहणार सुरू

December 22, 2016 8:52 PM0 commentsViews:

31st_party22 डिसेंबर :  नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यशौकिनांना आनंद आता आणखी द्विगुणा झालाय. 24, 25 आणि थर्डी फस्टच्या रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीला परवानगी देण्यात आलीये. पहाटे पाचवाजेपर्यंत बिअर बार सुरू राहणार आहे.

नाताळ आणि थर्डी फस्टच्या सेलिब्रिशेनसाठी सर्वत्र मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. खास करुन थर्टी फस्टच्या जल्लोषासाठी मोठे हॅाटेलपासून ते ढाब्यापर्यंत लगबग सुरू आहे. मद्यप्रेमींनीही आतापासूनच ओल्या पार्ट्यासाठी आयोजन सुरू झाले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मद्यविक्रीला उशिरापर्यंत परवानगी देण्यात आलीये.  24, 25 आणि 31 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. परदेशी मद्य रात्री साडेदहापासून ते पहाटे 1 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.  बिअर बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. मात्र, नगरपालिका आणि जिल्हापरिषद क्षेत्रातील मद्यदुकानं रात्री 10 ते पहाटे 1 वाजेपर्यंत खुली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close