काँग्रेसचं एक पाऊल मागे, पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाऐवजी सभा

December 22, 2016 11:59 PM0 commentsViews:

 pune_metro_cong

22 डिसेंबर : पुणे मेट्रोच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतली खरी पण आता एक पाऊल मागेही घेतलंय. पुणे मेट्रोचं भूमिपूजनऐवजी निषेध सभा घेणार असल्याचं कळतंय.

पुणे मेट्रोच्या वादात राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनंही उडी घेतलीय. विशेष म्हणजे या कामात स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच पुढाकार घेतलाय. पुणे मेट्रोला आमच्याच काळात मंजुरी मिळाली असल्यानेच त्याचं श्रेय हे आम्हीच घेणार आहोत, म्हणूनच पुणे काँग्रेसच्या वतीने त्यांनी भूमिपूजन करण्याचं जाहीर केलं.

मात्र, या कार्यक्रमाचं स्वरूप काय असावं यावरून काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. स्थानिक नेत्यांना भूमिपूजन करावं असं वाटतंय तर राज्य पातळीवरचे नेते निषेध सभा घ्यावी या मताचे आहे अशी माहिती सूत्रांनी आयबीएन-लोकमतला दिलीये. त्यामुळे काँग्रेस प्रतिकात्मक भूमिपूजन करणार की निषेध सभा घेणार याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close