आमिर खानचा बहुप्रतिक्षीत ‘दंगल’ आज प्रेक्षकांच्या भेटीला

December 23, 2016 9:53 AM0 commentsViews:

dangal

23 डिसेंबर :  आमिर खानचा बहुचर्चित दंगल हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. कुस्तीवीर महावीर सिंह फोगट आणि त्यांच्या मुली गीता आणि बबिता फोगट यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारीत आहे.

आमिरच्या या सिनेमातल्या लूकपासून ते त्याने आधी वाढवलेल्या आणि नंतर कमी केलेल्या वजनामुळे हा सिनेमा चर्चेत होता. त्यानंतर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या प्रमोशनसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला लावलेली हजेरी असो कींवा मग कोल्हापुरच्या तालमीला दिलेली भेट असो हा सिनेमा रिलीजपर्यंत चर्चेत राहिला.

आज ख्रिसमसच्या सुट्टीचा मुहूर्त साधत तब्बल 4600 स्क्रिन्समध्ये हा सिनेमा रिलीज होतोय. यात परदेशातील 1000 स्क्रिन्सचा समावेश आहे. एकंदरच आमिरने या सिनेमासाठी घेतलेली प्रचंड मेहनत पाहता हा सिनेमा यावर्षीचे कलेक्शनचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढेल असं दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close