शिवस्मारकासाठीच्या जल-माती कलशाची आज शोभायात्रा

December 23, 2016 10:08 AM0 commentsViews:

Chatrapati kalash

23 डिसेंबर :  शिवस्माररकाच्या भूमिपूजनासाठी राज्यातील सर्वच प्रमुख नद्या आणि गड-किल्ल्यांवरील माती आज मुंबईत दाखल होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या जलकलशांचं मुंबईत आज जंगी स्वागत केलं जाईल. त्यानंतर हे कलश मुख्यमंत्र्यांना सोपवलं जाणार आहेत. शिवस्मारकाच्या भूमीपूजनाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. या स्वागतासाठी चेंबूरमध्ये आज एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

या जलकलशांची भव्य मिरवणूक काढून ते विधीवत मुंबईत आणले जात आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या नियोजित जागी जातील, तेव्हा ही माती आणि पाणी त्याठिकाणी विसर्जीत करून त्यानंतरच शिवस्मारकाचं भूमीपूजन करण्यात येईल.

चेंबूरमधल्या चेंबूर नाका इथे हे सगळे जल आणि मातींचे कलश एकत्र आणून त्यांची मुंबईभर बाईक रॅली काढण्यात येईल. त्यानंतर वाजत गाजत हे कलश गेटवे आॅफ इंडियाला मुख्यमंत्री देवेंद्र फड्णवीस यांची हाती सोपवले जातील.

जळगावमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तापी, पूर्णा, गिरणा, पांझरा आणि बोरी नद्यांचं पाणी संकलित केलं, तर संत मुक्ताई, चांगदेव, सखाराम महाराज आणि असीरगडमधली माती एकत्र केलीय. तर कोल्हापुरातल्या पन्हाळा, विशाळगड, सामानगड, भुदरगड, रांगणा अशा किल्ल्यांवरची माती, आणि पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमाचं जल संकलित करण्यात आलं आहे.

नांदेडमधल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरची माती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संकलित केली. तर अहमदनगरमध्ये मुळा, प्रवरा आणि सीना नदीचं पाणी, तर प्रेमगिरी किल्ली, विश्रामगड, भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड, रतनगड आणि खर्डा किल्ल्यातली माती संकलित करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close