हृतिकनं भरला 80कोटींचा आयकर

December 23, 2016 10:00 AM0 commentsViews:

hrithik-roshan

23 डिसेंबर: आयकर भरण्याच्या बाबतीत हृतिक रोशन बाॅलिवूडचे तीन खान आणि अक्षय कुमार यांच्याही पुढे आहे. हृतिकनं 2016-17साठीचा 80 कोटी टॅक्स आधीच भरला.अॅडव्हान्स इनकम टॅक्स भरणारा तो नंबर वन ठरलाय.

गेल्या वर्षी हृतिक रोशननं 50 कोटींचा टॅक्स भरला होता.यावर्षी आमिर खानचा टॅक्स भरण्यात दुसरा नंबर आहे. त्यानं या वर्षी 72 कोटींचा टॅक्स भरलाय. तर तिसऱ्या नंबरवर आहे रणबीर कपूर. त्यानं 37 कोटी टॅक्स भरलाय.

अॅडव्हान्स टॅक्स भरण्यात सलमान खान चौथ्या नंबरवर आहे. त्यानं 14 कोटी टॅक्स जमा केलाय. अभिनेत्रींमध्ये सर्वात जास्त अॅडव्हान्स टॅक्स दीपिका पदुकोणनं भरलाय. तो आहे 3 कोटी. तर करिना कपूरनं 70 लाख रुपये टॅक्स भरलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close