उस्मानाबादमध्ये दोन बसची जोरदार धडक, 5 ठार

December 23, 2016 12:26 PM0 commentsViews:

bus Accident12

23 डिसेंबर : सोलापूर-हैदराबाद मार्गावर दोन एसटी बस गाड्यांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. २० प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी आठजणांची प्रकृती चिंताजनक आहे.

सोलापूर-हैदराबाद मार्गावर उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यातील येणेगूरजवळ आज (शुक्रवारी) सकाळी हा अपघात झाला. अपघातग्रस्त गाड्यांपैकी एक बस महाराष्ट्र परिवहन महामंडळाची होती. ही बस उमरग्याहून पुण्याकडे निघाली होती. तर, दुसरी कर्नाटक परिवहन महामंडळाची बसव-कल्याण ही गाडी होती. अपघातात दोन्ही गाड्यांचे चालक ठार झाले आहेत.

अपघातामुळं मुंबई-हैदराबाद मार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close