म्हाडाच्या घरांची आज सोडत

May 17, 2010 5:23 PM0 commentsViews: 5

18 मे

म्हाडाच्या 3,449 घरांसाठीआजसोडत निघणार आहे.

म्हाडाची ही घरे मुंबईत मानखुर्द, घाटकोपर, दहिसर, सायन प्रतीक्षा नगर, मालाड मालवणी आणि पवई या ठिकाणी आहेत.

अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी यामध्ये सर्वाधिक घरे आहेत.

म्हाडाच्या घरांसाठीची ही सोडत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी नऊ वाजेपासून सुरू झाली आहे.

म्हाडाची मुंबईत कुठे आणि कीती घरे आहेत, ते पाहूयात…

मानखुर्द, तुर्भे-मंडाले – 1 हजार 111 घरे

घाटकोपर कॅनरा इंजीनिअरिंग – 118 घरे

दहिसर, शैलेंद्र नगर – 56 घरे

सायन प्रतीक्षा नगर – 78 घरे

मालाड मालवणी – 1 हजार 828 घरे

पवई – 40 घरे

इतर ठिकाणी – 68 घरे

कुठल्या गटासाठी किती घरे…

अत्यल्प उत्पन्न गट- 2 हजार 762 घरे (सर्वाधिक 94,702 अर्ज)

अल्प उत्पन्न गट – 235 घरे (88, 661 अर्ज)

मध्यम उत्पन्न गट – 134 घरे (45, 523 अर्ज)

उच्च उत्पन्न गट – 318 घरे (88,820 अर्ज)

close