सीमेवर लढणारे सैनिक वेगळे असतात, मेटेंची नाराजी उघड

December 23, 2016 3:58 PM0 commentsViews:

mete_cm23 डिसेंबर : सिमेवर लढणारे सैनिक वेगळे असतात, प्रत्येकाची जबाबदारी ही वेगळी असते असं सांगत शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंची नाराजी उघड झालीये. विनायक मेटे यांना जलपूजनाच्या ठिकाणी नेण्यात येत नसल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जातयं.

शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. आज राज्यातील सर्वच प्रमुख नद्या आणि गडकिल्ल्यांवरील माती आज मुंबईत दाखल झाली.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या जलकलशांचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, दुसरीकडे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष असलेले विनायक मेटे नाराज असल्याचं समोर आलंय. उद्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर जलपूजनासाठी स्मारकाच्या प्रस्तावित ठिकाणी जाणार आहे. मात्र, यामध्ये विनायक मेटे नसणार आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. याबद्दल विनायक मेटे यांना विचारणा केली असता सिमेवर लढणारे सैनिक वेगळे असता, प्रत्येकाची जबाबदारी ही वेगळी असते असं सांगत त्यांनी आपली नाराजी बोलावून दाखवली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close