लिबियाचं विमान अपहरण नाट्य संपुष्टात, दोन्ही अपहरणकर्ते शरण

December 23, 2016 11:34 PM0 commentsViews:

malta423 डिसेंबर : लिबियामधील आफ्रिकिया एअरवेजच्या एका विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. दोन अपहरणकर्त्यांनी हे विमान अपहरण करून जबरदस्तीने माल्टा या शहरात उतरवलं. मात्र काही तासांच्या आत पोलिसांना शरण आले. सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आलीये.

आफ्रिकिया एअरवेजच्या ए-320 जातीचं हे विमानानं सेबावरुन त्रिपोलीकडे उड्डाण केलं होतं. अपहरणकर्त्यांनी विमानाचा ताबा घेऊन ते माल्टा शहरातील विमानतळावर जबरदस्तीने उतरवलं. अपहरणकर्त्यांनी विमान बॅाम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या विमानात 111 प्रवाशी आणि 7 क्रू मेंबर्स होते.  माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनीही या घटनेला दुजोरा दिला होता. मात्र, काही तासांत अपहरणकर्ते काही तासांत पोलिसांना शरण आले. मात्र, अपहरणकर्त्यांनी विमान का अपहरण केलं हे मात्र अजून कळू शकलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close