लैंगिक अत्याचार प्रकरणी माजी न्यायाधीशाला तीन वर्षांचा तुरुंगवास

December 23, 2016 6:13 PM0 commentsViews:

nagraj_shinde

23डिसेंबर:   लैंगिक अत्याचारप्रकरणी माजी न्यायाधीश नागराज शिंदे याला पुणे न्यायालयाने 3 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय. बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये शिक्षा सुनावाली. त्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं उघ़ड झालं होतं.

2014मध्ये आंबेगाव पठार इथल्या शेजारी मुलीवर त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.  या प्रकरणी अटक झाल्यानंतर पुण्य़ाच्या जिल्हा न्यायालयात हा खटला सुरू होता. अखेर आज दोषी माजी न्यायाधीश नागराज शिंदेला शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्याचा निकाल देताना कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड ठोठावलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close