नक्षलवाद्यांविरोधात एअर फोर्सचा वापर नाही

May 18, 2010 9:16 AM0 commentsViews: 1

18 मे

दंतेवाडातील कालच्या हल्ल्यानंतरही माओवाद्यांविरोधात एअर फोर्सचा वापर करणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे.

पण नक्षलग्रस्त भागाची हवाई पाहणी करण्यासाठी एअर फोर्सची मदत घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे अजूनही माओवाद्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.

तसेच नक्षलवाद फोफावण्यासाठी कुठेतरी आपणच जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. 'आयबीएन-18'चे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना पी. चिदंबरम यांनी ही माहिती दिली.

पाच राज्यांमध्ये इशारा

नक्षलवाद्यांनी दंतेवाडात काल पुन्हा केलेल्या हल्ल्यानंतर आता 5 राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. माओवाद्यांनी 48 तासांच्या बंदची हाक दिली आहे.

ओरिसा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढमध्ये हा बंद पुकारण्यात आला आहे. नफ्यात असलेल्या 10 सरकारी कंपन्यांमधील सरकारचा 10 टक्क्यापर्यंतचा हिस्सा विकण्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.

सोबतच ओरिसामध्ये 15 हजार एकरांची जमीन पॉस्को कंपनीला देण्याचाही निषेध करण्यात येत आहे.

close