मोठ्या संख्येनं हजर राहा, ‘मातोश्री’वरुन शिवसैनिकांना आदेश

December 23, 2016 11:44 PM0 commentsViews:

 uddhav_thackery_dasara_melava_2015_photo

23 डिसेंबर : शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजर राहण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन शिवसैनिकांना देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने हायजॅक केलेला सरकारी कार्यक्रमात शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

शनिवार शिवाजी महाराज्यांच्या प्रस्तावित अरबी समुद्रातील स्मारकाचा भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर सेना नेत्यांची बैठक झाली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थीतीत ही बैठक झाली. बैठकीत आगामी महापालिका निवडणुक आणि जिल्हा परीषद निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा झाली. उद्या मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईतील महत्वाच्या विकास प्रकल्पांचे जलपूजन होत आहेत. यावर ही चर्चा झाली. या बैठकीत शिवसैनिकांना भूमिपूजन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजर राहण्य़ाचे आदेश देण्यात आलेत. भूमिपूजन सोहळा हा सबकुछ भाजप असं होऊ द्यायचा नाही असा प्रयत्न शिवसेनेचा असणार आहे. शिवसेना उघड काही बोलत नसली तरी शिवसेना उद्या शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close