LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन संपन्न

December 24, 2016 2:49 PM0 commentsViews:

modi new banner1231

24 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (शनिवारी) अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या शिवस्मारकाचं तसंच पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. यासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. या कार्यक्रमांना पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यावर उपस्थित राहणार आहेत.

 मोदी दुपारी मुंबईत दाखल झाल्यानंतर लगेचच ते नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून रायगडाच्या पायथ्याशी रवाना झाले. तिथं त्यांनी एनआयएसएमचं उदघाटन केलं. रायगडनंतर मोदी मुंबईत परतणार आहेत आणि लंचनंतर शिवस्मारकाच्या उदघाटनासाठी मोदी अरबी समुद्रात जातील. त्या पार्श्वभूमीवर मुंबईची चौपटी भगवी झालीय. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आला आहे.

सामान्य नागरीकांना त्या भागात जायलाही बंदी घालण्यात आलीय. शिवस्मारकाचं भूमिपुजन हा मोदींच्या दौऱ्यातला सर्वात मोठा राजकीय कार्यक्रम आहे. तो पार पाडल्यानंतर मुंबईतल्या बीकेसीत त्यांची जाहीर सभा आहे. राज्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालंय आणि आता महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मोदींच्या सभेनं भाजपा पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकतंय.

दरम्यान, मोदी सभेत काय बोलणार याचीही उत्सुकता आहे. विशेष म्हणजे शिवस्मारकाच्या भूमीपूजनाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. तर पुण्यात शरद पवार पुणे मेट्रोच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी येणार आहेत. यानिमित्ताने पवार आणि मोदी पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

याशिवाय मुंबईतील बीकेसी विविध प्रकल्पाचं भूमिपूजन तसंच पनवेलमध्ये संस्थेचं उद्घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत. याबरोबर मेट्रो आणि रेल्वेच्या नव्या प्रकल्पांच्या कामांचेही भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पांचे भूमिपूजन होत असल्याने मुंबईसह इतर शहरांच्या पालिका निवडणुकांच्या प्रचाराची नांदी म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.

नरेंद्र मोदींच्या आज सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर रात्री आठपर्यंत मोदींचे विविध कार्यक्रम आहेत. रात्री आठ वाजता ते दिल्लीकडे रवाना होणार आहे.

असा असेल मोदींचा दौरा

10:00 दिल्लीहून रवाना
11:45 मुंबईत आगमन
12:10 पाताळगंगा , रायगड येथे हेलिकॉप्टरनं आगमन
1:25 आयएनएस शिक्रा नौदल तळावर आगमन
1:55 राजभवनवर भोजन
2:15 गिरगाव चौपाटीवर आगमन
2:30 हॉवरक्राफ्टने अरबी समुद्रातल्या प्रस्तावित स्मारकापर्यंत जाणार
2:50 शिवस्मारकाच्या प्रस्तावित जागेचं भूमिपूजन
3:30 बीकेसी ब्रांद्रा येथे मेट्रोचं भूमिपूजन
6:10 ला पुणे मेट्रोचं भूमिपूजन


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close