मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम पोलिसांच्या नजरकैदेत

December 24, 2016 1:38 PM0 commentsViews:

sanjay nirupam

24 डिसेंबर :  नोटाबंदीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी मूक मोर्चाचे नियोजन केलेले काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांना पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असेपर्यंत त्यांना घराबाहेर पडू नका असं पोलिसांनी सांगितलं आहे.

विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी आज (शनिवारी) मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी मुंबईत असल्याने संजय निरुपम नोटाबंदीविरोधात वांद्रे कुर्ला संकुलात मूकमोर्चा काढणार आहेत. बीकेसीमध्ये पंतप्रधान विविध प्रकल्पांचे भूमीपूजन करणार आहेत.

मात्र त्याआधीच संजय निरुपम यांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे.  तसंच त्यांच्या घराबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close