विदर्भात उष्माघाताचे 14 बळी

May 18, 2010 9:36 AM0 commentsViews: 2

18 मे

विदर्भात उष्माघातामुळे गेल्या 24 तासांत 14 बळी गेले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात 5, नागपूर जिल्ह्यात 6, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक बळी गेला आहे.

सध्या विदर्भात सरासरीपेक्षा तापमान 4 अंश सेल्सियने जास्त आहे. वर्ध्यात पारा 47 डिग्रीच्या वर तर नागपुरात 46 डिग्रीच्या वर गेला आहे.

वाढत्या उन्हाचे चटके आणि लोडशेडिंग यामुळे विदर्भातील जनता हैराण झाली आहे.

close