सहा खेळाडूंना नोटीस

May 18, 2010 10:07 AM0 commentsViews: 4

18 मे

अपेक्षेप्रमाणेच बीसीसीआयने 6 भारतीय खेळाडूंवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

युवराज सिंग, झहीर खान, रोहीत शर्मा, आशीष नेहरा, पियुष चावला आणि रवींद्र जडेजा अशी या खेळाडूंची नावे आहेत.

खेळाडूंवर बेशिस्त वर्तन आणि हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला. मैदानाबाहेर बेशिस्त वर्तन आणि रात्री पबमध्ये फॅन्सबरोबर झालेली बाचाबाची यामुळे खेळाडूंवर ही कारवाई झाल्याचे बोलले जाते.

टीम मॅनेजर रंजीब बिस्वाल यांनी कालच आपला रिपोर्ट बीसीसीआयला सादर केला होता. आणि त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांची त्यांनी भेट घेतली होती.

त्यानंतर सीओओ रत्नाकर शेट्टी यांनी मीडियाशी बोलताना टीममधल्या काही खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे सुतोवाच केले होते.

आज बोर्डाने अधिकृतपणे कारवाई करताना खेळाडूंकडून स्पष्टीकरण मागितले. खेळाडूंना आपली बाजू मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.

close