आता 50 दिवसांनंतर बेईमानांचे बुरे दिन येतील -पंतप्रधान मोदी

December 24, 2016 6:21 PM0 commentsViews:

narendra_modi_mumbai23 डिसेंबर : तुम्हाला 50 दिवस त्रास होईल असं सांगितलं होतं. पण अजून काही दिवस त्रास सहन करा, कारण 50 दिवसांनंतर प्रामाणिक माणसांचा त्रास कमी होईल आणि बेईमान माणसाचे बुरे दिवस येतील असं सांगत नोटबंदीवर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार समर्थन केलं.  तसंच गेली 70 वर्ष मलई खाणारे लोकं आता सव्वाशे कोटी भारतीयांना जिंकू शकत नाही  असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोलाही लगावलाय. ते मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळी मुंबईतील अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकचा जलपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर वांद्रे येथील बीकेसी मैदानावर जंगी सभा झालीय. यासभेत भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भाषण केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपला चिमटे काढले. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते 1 हजार 70 विकास प्रकल्पांचं उद्गघाटन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितींना संबोधन केलं.

‘शिवरायांना मराठीतून मानाचा मुजरा’

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घातला.  2014 ला माझ्यावर निवडणुकीची जबाबदारी दिली होती तेव्ही मी सर्वप्रथम रायगडावर गेलो होतो . रायगडावर छत्रपतींच्या समाधीपुढ बसलो. कारण सुशासन, प्रशासनाचा अध्याय शिवाजी महाराजांनी लिहिला. संकटात, संघर्षपूर्ण जिवनात त्यांनी हे सर्व केलं.  जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखं व्यक्तिमत्व दुर्मिळ आहे. त्यामुळे शिवरायाचं भव्य आणि जगाला हेवा वाटावे असं स्मारकाच्या जलपूजनाचं काम माझ्या हातून झालं हे मी माझं भाग्य समजतो अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. तसंच शिवाजी महाराज हे फक्त युद्धांपुरते मर्यादित नव्हते, महाराजाचं धोरणं आदर्शवत होते. जगाला आकर्षित करण्यासाठी ताजमहलाखेरीज बरंच काही आहे. त्यामुले साहसी पर्यटनासाठी गड-किल्ले खुले करणार अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.

‘देश बदलणारच’

त्यानंतर मोदींनी भाजप सरकारच्या कामाचा पाढा वाचून दाखवला. गरिबांना गॅस सिलेंडर देऊन महिलांची धुरातून मुक्ताता केली.1 हजार गावांमध्ये वीज पुरवणार आहोत.  कोण म्हणतं देश बदलत नाही, सव्वाशे कोटी जनतेच्या विश्वासावर हा देश बदलू शकतो. हा देश बदलू शकतो आणि बदलणारच असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

‘आता काळा पैशावाल्याचे बुरे दिन’

आम्ही मागील महिन्यात 8 नोव्हेंबरला हल्ला केला. तो हल्ला देशाच्या विकासासाठी होता. तो हल्ला काळा पैशावाल्यांवर होता. तेव्हा मी सांगितलं होतं. नोटबंदीमुळे त्रास होईल. तुम्हाला 50 दिवस त्रास झाला असेल. अजून काही दिवस होईल. पण नोटबंदीमुळे जनतेनं त्रास सहन केला पण जनता सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अनेक लोकांना काहीही करावं वाटलं. काही लोकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काळ्याचं पाढरं करावं पण तेही अडकले आणि अधिकारीही अडकले. त्यामुळे अजून काही दिवस त्रास सहन करा जेव्हा 50 दिवस होतील तेव्हा प्रामाणिक माणसांना त्रास होणार नाही आणि बेईमानांना बुरे दिन येतील असा इशाराच मोदींनी काळा पैशावाल्यांना दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close