उद्धव ठाकरेंची मागणी अन् पंतप्रधानांकडून लगेच घोषणा

December 24, 2016 6:56 PM0 commentsViews:

uddhav_and_pm23 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बीकेसीतील सभेत एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शिवस्मारक तर आपण बांधतोय पण शिवरायांचे गड-किल्ले पुरातत्व खात्यातून मुक्ता करा त्याची देखभाल आम्ही करू अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. पंतप्रधानांनी याची दखल घेत लगेच घोषणाही केली.

बीकेसी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मेट्रो प्रकल्पांचं उद्घघाटन पार पडलं. यावेळी व्यासपीठावर उद्धव ठाकरेही उपस्थिती होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपने हायजॅक केलेल्या शिवस्मारक सोहळ्याचा समाचार घेतला. शिवस्मारकाला आधीच्या आघाडी सरकारने मंजुरी दिले पण त्यांच्या मनात भूमिपूजनचा विचार नव्हता. आता आपले सरकार आले आहे. आपण शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा पूर्ण करून दाखवला आहे. मात्र, हे करत असताना भवानी मातेची तलवार तुम्हाला पेलेला का ? हा मोठा प्रश्न आहे.   शिवरायाचं स्मारक उभारणं हे काही येड्या गबाळ्याचं काम नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

तसंच स्मारक उभं करतोय, पण एकच काम करा. गड किल्ले पुरातत्व खात्यातून मुक्त करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली. पंतप्रधानांनीही उद्धव ठाकरे यांच्या मागणीची दखल घेत साहसी पर्यटनासाठी गड-किल्ले खुले करणार अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. मात्र, उद्धव ठाकरे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी घोषणा देऊन व्यत्यय आणण्याचा प्रयत्नही केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close