मोदींना काळे झेंडे दाखवण्याआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड

December 24, 2016 7:06 PM0 commentsViews:

pune_congress23 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे शहरात पुणे मेट्रोच भूमिपूजन करण्याकरिता येत असताना पुणे शहर काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. काळे झेंडे दाखवून आणि घोषणा देऊन आंदोलन करण्यात आलं.

पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली  एयरपोर्ट रोडवरील बर्माशेल चौकात हे आंदोलन करण्यात आलं. मोदी यांनी केलेल्या नोटबंदी आणि मोदी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोपाविरोधात  हे अंदोलन करण्यात आलं होतं.  पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.  यावेली काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्कीही झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close