पावसासाठी गोफण युद्ध

May 18, 2010 10:16 AM0 commentsViews: 68

18 मे

कोपरगाव तालुक्यात आज गोफण युद्ध सुरू आहे.

या तालुक्यातील कोकमठाण आणि संवत्सर या दोन गावांमध्ये हे गोफण युद्ध सुरू आहे. या युद्धात वापर होतो तो गोफणीच्या दगडांचा.

दोन्ही गावांतील गावकरी एकमेकांवर दगड मारतात. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात ही परंपरा सुरू आहे. एकमेकांना दगड मारले तर चांगला पाऊस पडेल, अशी या लोकांची भावना आहे.

गोफण धोड्यांच्या या खेळाला अक्षय तृतीयेपासून सुरुवात होते. हा खेळ पाच दिवस चालतो.

close