अंबरनाथमध्ये पाईपफुटी

May 18, 2010 10:26 AM0 commentsViews: 2

18 मे

मुंबईत एकीकडे पाणीबचतीसाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे पाणी गळतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. अंबरनाथच्या नवरेनगर परिसरात 16 मिलीमीटरची पाईपलाईन दोन आठवड्यापासून फुटली आहे.

पण फुटलेल्या पाईपलाईनकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचार्‍यांचे लक्ष गेलेले नाही.

यातून आत्तापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. फुटलेल्या पाईपलाईनमधून बाजूच्या झोपडपट्टीतील लोक पाणी नेत आहेत.

अंबरनाथच्या चिखलोली धरणात सध्या 350 एमएलडी इतका पाणी साठा आहे. हा पाणी साठा केवळ एक महिनाभर पुरेल इतकाच आहे.

close