नाताळ सण मोठा,नाही आनंदा तोटा

December 25, 2016 1:13 PM0 commentsViews:

CHRISTMAS

25 डिसेंबर : देशभरात नाताळ सणाचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा होत आहे.ख्रिस्ती बांधवांच्या कुटुंबात उत्साहाला उधाण आलं आहे.आकर्षक रोषणाई तसेच काही ठिकाणी ख्रिसमस ट्री उभारण्यात आले आहेत.

शहरातील विविध चर्चसह प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात येशू जन्मोत्सव साजरा झाला.चर्चमध्येही नाताळच्या पार्श्‍वभूमीवर मागील काही दिवसांपासून अनेक धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबवले गेले.गवत, माती, पुतळे आणि चित्रांच्या सहाय्याने येशू जन्माचे प्रसंग देखाव्यातून साकारण्यात आले आहेत.रात्री दहा नंतर प्रभू येशुची भक्तीपर गाणी गाऊन त्याची उपासना करण्यात आली.तसंच शहरातील काही चर्चमध्ये रात्री दहानंतर प्रभू येशूच्या जन्मकाळाचा आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी ख्रिस्ताची पवित्र वचनं सांगत त्याची विशेष उपासना करण्यात आली. जिंगल बेल्स, जिंगल बेल्सची धून, केक, भेटवस्तू अस उत्साहाचे वातावरण सगळीकडे पाहायला मिळत आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या प्रमुख शहरांसह देशातील इतरही भागात ख्रिस्त बांधवांनी स्थानिक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. सर्व चर्चेस ख्रिसमसनिमित्त विशेष ख्रिसमस ट्री, चांदण्या आणि बेल्सची मनमोहक सजावट पाहायला मिळत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close