समृद्धी हायवेवरून शिवसेना भाजप आमने-सामने

December 25, 2016 4:50 PM0 commentsViews:

 

uddhavfadnavis-ss-11-10-14

25डिसेंबर: मुंबई नागपूर समृद्धी हायवेवरून भाजप शिवसेनेत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. शहापूरमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना बेघर होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलीये.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना बेघर होऊ देणार नाही त्यांच्या सुपिक जमिनी हायवेमध्ये जाऊ देणार नाही असा पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतलाय. प्रकल्प करताना सरकार आश्वासनं देतं पण नंतर ती पाळली जात नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पासाठी आग्रही आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी आता शेतकऱ्यांसाठी विरोधाची भूमिका घेतल्यानं भविष्यात या प्रकल्पावरुन युतीत तणातणी होण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close